द्रोणाचार्य अवॉर्ड मिळण्याच्या काही तास अगोदर अ‍ॅथलेटिक्स कोचचे निधन !

नवी दिल्ली : अनुभवी अ‍ॅथलेटिक्स कोच पुरुषोत्तम राय यांचे शुक्रवारी बेंगळुरूमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी त्यांना राष्ट्रीय खेळ पुरस्कार सोहळ्यात (व्हर्च्युअल) द्रोणाचार्य पुरस्काराने समन्मानित केले जाणार होते. अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रमुख अधिकार्‍यांनी म्हटले, त्यांनी राष्ट्रीय खेळ पुरस्काराच्या पूर्वसरावात भाग घेतला, परंतु नंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

79 वर्षांचे पुरुषोत्तम राय 2001मध्ये भारतीय खेळ प्राधिकरणाच्या कोच पदावरून निवृत्त झाले होते. राय यांनी वंदना राव, अश्विनी नाचप्पा, प्रमिला अयप्पा, रोजा कुट्टी, एमके आशा, बी शायला, मुरली कुट्टन यासारख्या प्रमुख अ‍ॅथलीटना कोचिंग दिले होते. 1974 मध्ये नेताजी इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टमधून डिप्लोमा मिळाल्यानंतर राय यांनी आपले कोचिंग करियर सुरू केले होते.

माजी लांब उडी खेळाडू अंजू बेबी जॉर्जने म्हटले, ते एक चांगले कोच होते, ज्यांच्याकडून ऑलम्पिकसह अनेक प्रमुख भारतीय अ‍ॅथलीटसने प्रशिक्षण घेतले होते. पुरस्कार मिळवण्याच्या एक दिवस अगोदर त्यांचे निधन झाले.

अश्विनी नचप्पाने म्हटले, ते माझे पहिले कोच होते. त्यांनी माझा प्रवास खुप खास केला. माझ्या प्रतिभेवर ज्याप्रकारे त्यांचा विश्वास होता, त्याचमुळे मला इतके यश मिळाले.

राय यांनी 1987 जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, 1988 एशियन ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप आणि 1999 एसएएफ गेम्ससाठी भारतीय टीमला सुद्धा कोचिंग दिले. ते सर्व्हिसेस, युवा सशक्तीकरण आणि खेळ विभाग आणि भारतीय खेळ प्राधिकारणाकडून कोच म्हणून संबंधित होते.