Video : जुळ्या बहिणींनी बनवला असा व्हिडिओ, लोक म्हणाले – ‘आरशासमोर एकच मुलगी’

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी-कधी असे काही वायरल होते जे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. सध्या जमैकाच्या जुळ्या बहिणींचा एक व्हिडिओ वायरल होत आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओत त्या दोन बहिणींनी कमाल केली आहे.

जमैकाच्या दोन जुळ्या बहिणी इंस्टाग्रामवर खुप फेमस आहेत. त्यांची नावे शारोना आणि कारोना आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. अलिकडेच त्यांचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या एक मिरर इमेज बनवताना दिसत आहेत.

हा वायरल व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की, जसेकाही एकच मुलगी एखाद्या आरशा समोर उभी आहे आणि डान्स करत आहे. परंतु असे नाही. दोन्ही बहिणी एकमेकींसमोर उभ्या आहेत आणि एकसारख्या एक्सप्रेशन देत आहेत.

एकसारखा मेकअप आणि समोरा-समोर उभ्या असल्याने असे वाटत आहे की, दोघी नाहीत तर एकच मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर येताच हा व्हिडिओ वायरल झाला आणि लोक कन्फ्यूज झाले. लोकांना वाटले की एकच मुलगी आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर लोकांना समजले की, या दोघी आहेत.

या दोघी बहिणींची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ आहेत जे दोघी शेयर करत असतात. दोघींचा डान्स आणि एक्सप्रेशन हुबेहुब आहेत. इतकेच नव्हे, दोघींचा मेकअप सुद्धा एकसारखाच आहे. अजूनही दोघींचा मिररवाला व्हिडिओ वायरल होत आहे.