‘ऍटलास’च्या मालकाची पत्नी ‘नताशा’नं सुसाईड नोटमध्ये लिहिलं – ‘स्वतःच्या नजरेतून उतरली होती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऍटलास सायकल कंपनीच्या मालकांपैकी एक असलेले संजय कपूर यांची पत्नी नताशा कपूर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्या करण्यासाठी स्वतःला जबाबदार सांगितलं आहे. त्या आपल्या सुसाईड नोटबरोबरच काही रहस्येदेखील सोडून गेल्या आहेत.

५७ वर्षीय नताशा कपूरनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, ‘मी स्वतः माझा जीव घेत आहे. यासाठी कुणीच जबाबदार नाही. मी असे काही कृत्य केलं आहे की जे मी करायला नको होतं. त्यामुळं मी माझ्याच नजरेतून उतरली आहे.’ अजून तरी हे समोर आले नाही की नताशा कपूरनं असं कोणतं काम केलं होतं की ज्यामुळे त्यांना आत्महत्या सारखं पाऊल उचलावं लागलं.

सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी नताशा यांचा मोबाईल देखील जप्त केला होता. सुसाईड करण्याअगोदर नताशा यांनी कुणाला तरी ४ ते ५ संदेश पाठवले होते. नताशा संदेशात पैशांची मागणी करत होत्या. पोलीस तपास करत आहेत की नताशा यांनी कुणाला पैसे दिले होते का ज्याने त्या पैशांची परत मागणी करत होत्या. सध्या नताशाचे कुटुंबिय काही माहिती सांगण्याच्या स्थितीत नाही.

नताशानं आपल्या सुसाईड नोटमध्ये पतीच्या आणि कुटुंबाच्या प्रति प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘मी संजय कपूर, आमचा मुलगा आणि मुलगी या सर्वांवर खूप प्रेम करते.’ दिल्ली पोलिसांना मिळालेली ही सुसाईड नोट हाप पेजची आहे. मंगळवारी नताशा कपूरनं फाशी घेऊन आत्महत्या केली होती. दिल्लीतील औरंगजेब लेन येथील कोठी मध्ये त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

बुधवारी नताशा कपूर यांचं पोस्टमार्टम आरएमएल हॉस्पिटल मध्ये करण्यात आलं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांच्या मृतदेहास कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर बुधवारी लोधी रोड स्थित श्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नताशा कपूर या त्यांचे पती संजय कपूर आणि परिवारासोबत दिल्लीच्या औरंगजेब लेन मध्ये राहत होत्या.

फेसबुक पेज लाईक करा –