Atlas cycles च्या मालकीण नताशा कपूर यांनी ‘सुसाईड’ नोटमध्ये लिहीलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅटलस सायकल (Atlas Cycles) या कंपनीचे मालक संजय कपूर यांची पत्नी नताशा कपूर यांनी मंगळवारी लुटियंस दिल्लीमध्ये आपल्या औरंगजेब लेनमध्ये असलेल्या निवासस्थानी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट सोडली आहे. या सुसाइड नोटमध्ये नताशा कपूरने मी असे काहीतरी केले आहे जे मी करायला नको होते आणि तो केल्याची मला लाज वाटते, असे लिहीले आहे.

पोलिसांनी सांगितले की नताशा कपूर यांनी सुसाइड नोटमध्ये आपल्या कुटूंबातील सदस्यांना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले होते. असे असले तरी त्यांनी आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केलेला नाही. 57 वर्षीय नताशा यांनी असे ही म्हणले आहे की आयुष्य संपवण्याच्या निर्णयाला आणखी कोणी जबाबदार नाही.

त्यांनी लिहिले की, मी स्वत:चे आयुष्य स्वमर्जीने संपवत आहे. कोणताही व्यक्ती यासाठी जबाबदार नाही. मी असे काही केले आहे ज्याची कल्पना देखील कोणी करु शकत नाही. मला स्वत:ची लाज वाटते. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. संजय, माझा मुलगा आणि माझी मुलगी, आय लव्ह यू ऑल.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, त्यांनी मंगळवारी दुपारी 3.30 च्या आसपास आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितले की नताशा कपूर यांच्या मुलाने त्यांना सांगितले की त्यांनी आपल्या आईला तिच्या मोबाइल फोनवर 1-2 वेळा फोन केला. तिला दुपारी जेवणाला येण्यास सांगितले. परंतु तिने काहीही उत्तर दिले नाही. अखेर ते आईला बोलवण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी पाहिले की आईच्या खोलीचा दरवाजा बंद होता, परंतु दरवाजा आतून बंद नव्हता.

जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी आपल्या आईच्या खोलीचा दरवाजा वाजवला, परंतु त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही. दरवाजा आतून बंद नसल्याने त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि आपल्या आईला ओढणीने छताच्या पंख्याला लटकलेले पाहिले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी नोकरांच्या मदतीने आईच्या गळातील फास सोडवला आणि शरीर बेडवर ठेवले. नताशा कपूर यांना त्यानंतर रुग्णालयात घेऊन जाण्यात आले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like