मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुदतवाढीवर झाला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आयुक्त संजय बर्वे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढवल्याने ते नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे.

माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी बर्वे यांची नियुक्त करण्यात आली होती. मुंबईचे पोलीस आयुक्तपदी आल्यानंतर फारच कमी काळ मिळालेला असला तरी बर्वे यांनी पदाची धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळली होती. कलम ३७० हटवल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हे लक्षात घेता निवडणुकीच्या काळात बर्वे यांच्यासारखा पोलीस अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी योग्य ठरेल असा विचार करून त्यांना मुदतवाढ दिली आहे.

बर्वे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बर्वे यांनी यापूर्वी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. बर्वे हे कर्तव्यदक्ष, हुशार आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –