ATM मधून पैसे काढते वेळी ‘या’ लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा रिकामं होऊ शकतं बँक ‘अकाऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएममुळे पैसे काढणं सोपं झालं असलं तरी यामुळे होणारे अनेक फ्रॉडही अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे एटीएमचा वापर करतान थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. एटीएममधून पैसे काढण्याआधी हे जाणून घ्या की ते किती सुरक्षित आहे. कारण कार्ड क्लोनिंगच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

अशा प्रकारे चोरली जाऊ शकते तुमची खासगी माहिती

– एटीएम इन्सर्ट करण्याच्या स्लॉटमधून तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो.
– कार्ड स्लॉटमध्ये एक डिव्हाईस लावलं जातं ज्यामुळे माहिती स्कॅन केली जाते.
– यानंतर ब्लूटूथ किंवा कोणत्याही वायरलेसचा वापर करून डेटा चोरला जाऊ शकतो.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या

1) तुमच्या पिनशिवाय हॅकरचं पुढचं काम होणार नाही. त्यामुळे एटीएममध्ये पिन टाकताना दुसऱ्या हाताने तो लपवण्याचा प्रयत्न करा. कारण कॅमेऱ्याच्या मदतीने पिन चोरला जाऊ शकतो किंवा ट्रॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे पिन टाकताना सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही याची काळजी घ्या.

2) एटीएममध्ये गेल्यानंतर मशीनचं कार्ड स्लॉट नीट बघा. त्यात काही गडबड आहे असं वाटत असेल तर त्या एटीएमचा वापर करणं टाळा.

3) कार्ड इन्सर्ट करताना तेथे जी लाईट लागते त्यावर लक्ष द्या. जर ग्रीन लाईट लागत असेल तर एटीएम सुरक्षित आहे. लाल किंवा इतर रंगाची लाईट असेल तर एटीएमचा वापर करू नका. कारण त्यात काही गडबड असू शकते.

4) जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात फसला आहात आणि बँक बंद आहे तर अशा वेळी तुम्हा पोलिसांशी संपर्क साधावा. कारण तिथे तुम्हाला हॅकरचे फिंगरप्रिंट मिळू शकतात. सोबत जवळपास कोणतं ब्लूटूथ डिव्हाईस काम करत आहे का हेही तुम्ही पाहू शकता. याचा वापर करून तुम्ही सहज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता.

फेसबुक पेज लाईक करा –