ATM Cash Withdrawal | एटीएममधून कॅश काढताना ‘या’ लाईटकडे आवश्य ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाऊंट

नवी दिल्ली : ATM Cash Withdrawal | आजकाल सर्वजण एटीएममधून पैसे काढतात. पण एटीएममधून पैसे काढताना तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते (ATM Cash Withdrawal). सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमध्ये (Increase In Cyber Crime), ऑनलाइन व्यवहार (Online Transaction)आणि एटीएममधून पैसे काढणे देखील सुरक्षित नाही (ATM Card Cloning).

 

सायबर ठग खूप हुशार असतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढता तेव्हा काळजी घ्या. एटीएममधून पैसे काढताना तुम्ही येथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

 

एटीएम क्लोनिंग म्हणजे काय?

तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल, तर एटीएम वापरल्यानंतर तुम्ही ते काळजीपूर्वक तपासले पाहिजे. वास्तविक, एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंग (ATM Card Cloning) चा आहे. येथून तुमचे तपशील सहज काढले जातात आणि तुमचे खाते क्षणार्धात रिकामे होते. येथे तुमचे तपशील कसे चोरले जातात ते जाणून घेऊया. (ATM Cash Withdrawal)

 

सायबर चोर अशाप्रकारे चोरतात डेटा

डिजिटल इंडियामध्ये हॅकर्सही खूप स्मार्ट झाले आहेत. हे हॅकर्स एटीएम मशिनमधील कार्ड स्लॉटमधून ग्राहकांचे बँकिंग तपशील चोरतात. तुम्हाला माहितीही नसते आणि हे हॅकर्स एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे उपकरण ठेवतात, जे तुमच्या कार्डचे तपशील स्कॅन करते.

 

या उपकरणाद्वारे तुमचे सर्व तपशील सेव्ह केले जातात. त्यानंतर ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस उपकरणाच्या मदतीने हॅकर्स हा डेटा चोरतात.

 

कसे रहावे सतर्क?

हॅकर्स कितीही हुशार असोत, पण तुम्ही सतर्क असाल तर तुमचे पैसे सुरक्षित राहतील. वास्तविक, तुमच्या डेबिट कार्डचा पूर्ण अ‍ॅक्सेस घेण्यासाठी हॅकरकडे तुमचा पिन क्रमांक असणे अनिवार्य आहे. मात्र, यासाठी सुद्धा हॅकर्सकडे एक पद्धत असते.

 

ते कॅमेर्‍याने तुमचा पिन नंबर ट्रॅक करतात. म्हणजेच ते तुमच्या डेटाच्या चोरीसाठी पूर्णपणे तयार असतात. अशावेळी जेव्हा तुम्ही पिन नंबर टाकाल तेव्हा तो दुसर्‍या हाताने झाकून टाका.

 

पैसे काढण्यापूर्वी एटीएम चेक करा

1. तुम्ही एटीएममध्ये गेल्यास आधी एटीएम मशीनचा कार्ड स्लॉट तपासा.
2. एटीएम कार्डच्या स्लॉटमध्ये काही छेडछाड झाली असेल किंवा स्लॉट सैल असेल तर त्याचा वापर करू नका.
3. कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्यामध्ये पेटणार्‍या ’ग्रीन लाईट’ (Grenn Light) वर लक्ष ठेवा.
4. जर इथल्या स्लॉटमध्ये हिरवा लाईट असेल तर तुमचे एटीएम सुरक्षित आहे.
5. जर त्यात लाल किंवा इतर कोणताही लाईट नसेल तर कोणत्याही स्थितीत एटीएम वापरू नका.

 

Web Title :- ATM Cash Withdrawal | atm cash withdrawal when you use atm focus on green light for safe transaction see details atm card cloning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा