ATM Cash Withdrawal | ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यावर द्यावे लागेल जास्त शुल्क, RBI चा ‘हा’ नियम होणार लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या बहुतांश लोक एटीएममधून कॅश विड्रॉल (ATM Cash Withdrawal) करतात. या बदल्यात त्यांना एक ठराविक चार्ज आकारला जातो. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) इंटरचेंज शुल्क वाढवले होते, ज्यामुळे आणि आर्थिक व्यवहारांसाठी पहिल्याच्या तुलनेत जास्त शुल्क (ATM Cash Withdrawal) द्यावे लागेल. नवीन नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल.

या अंतर्गत आर्थिक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून वाढवून 17 रुपये केले आहे, तर विना-आर्थिक व्यवहारासाठी 5 ते 6 रुपयांपर्यंतची वाढ केली गेली आहे. आरबीआयनुसार ग्राहक दर महिना आपल्या बँकेच्या ATM मधून पाच मोफत व्यवहार करू शकतात, ज्यामध्ये आर्थिक आणि विना-आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. ते इतर बँकेच्या एटीएममधून सुद्धा मोफत व्यवहारासाठी आहेत, ज्यामध्ये महानगरांमध्ये तीन व्यवहार आणि इतर ठिकाणी पाच व्यवहारांचा समावेश आहे.

ग्राहक शुल्कात सुद्धा होईल वाढ
ग्राहक शुल्काची मर्यादा सध्या प्रति व्यवहार 20 रुपये आहे, जी 1 जानेवारी 2022 पासून वाढवून 21 रुपये केली जाईल. बँकांना उच्च इंटरचेंज शुल्काची भरपाई करणे आणि खर्चात सामान्य वाढ पाहता आरबीआयने बँकांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार वाढवण्याची परवानगी दिली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून प्रभावी होईल.

आयसीआयसीआय बँकेने जारी केली नोटीस
आयसीआयसीआय बँकेने रोख व्यवहार,
एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्काच्या सुधारित मर्यादेबाबत नोटीस जारी केली आहे.
सुधारित शुल्क वेतन खात्यांसह स्थानिक बचत खातेधारकांसाठी 1 ऑगस्टपासून लागू होईल.

Web Title :-  ATM Cash Withdrawal | rbi increased interchange fee on atm transaction it will implement from 1 august

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | पीएम किसान योजनेत महाराष्ट्रातील 4.45 लाख लाभार्थी अपात्र

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला