‘ATM’ मधून 10000 पेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी लागणार ‘OTP’, ‘या’ बँकेने सुरु केली ‘सुविधा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ATM व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आता पिन ऐवजी वन टाइम पासवर्डची (OTP) सुविधा सुरु करण्यात आली आहे. कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा आणली आहे, यामुळे ग्राहकांना ATM मधून पैसे काढताना त्यांच्या नोंदणी असलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल. जर तुम्ही 10,000 पेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढणार असाल तर तुम्हाला हा ओटीपी येईल. कॅनरा बँकेने ट्विट करत या सेवेची माहिती देिली. या ट्विट मध्ये म्हटले आहे की, आम्ही भारतातील पहिली ATM विड्रॉल OTP सुविधा सुरु करत आहे. आता ATM विड्रॉल अधिक सुरक्षित असेल.

कॅनरा बँकद्वारे ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे, यात पैसे काढताना OTP येणार आहे. याच महिन्यात RBI ने सांगितले की, तांत्रिक कारणं म्हणजेच हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कम्युनिकेशन संबंधित अडचणी, एटीएममध्ये रोख नसणे. यामुळे जर व्यवहार फेेल झाले तर हे ट्रान्जेकशन म्हणून गृहित धरण्यात येणार नाही. RBI ने NEFT करणाऱ्या लोकांसाठी मोठी घोषणा केली होती. डिसेंबर 2019 पासून NEFT प्रणाली 24*7 तास सुरु राहिल. कॅनरा बँकेच्या या सुविधेमुळे ग्राहकांना ATM चे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –