विना कार्ड ATM मधून काढू शकता कॅश, परंतु लोकांना अजुनही माहित नाही प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएम (ATM) मशीनमधून पैसे काढायचे असतील तर डेबिट कार्ड आवश्यक आहे. पण आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही डेबिट कार्डशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल हवा आहे. यासाठी एटीएम कार्डची (ATM) गरज नाही. ही बँकिंग सेवा अनेक दिवसांपासून सुरू आहे.

 

अनेक बँका आधीच आपल्या ग्राहकांना कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देत होत्या, पण आता रिझर्व्ह बँकेने त्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. या सुविधेसाठी युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरले जाते. आरबीआयने बँकांना कार्ड न वापरता पैसे काढण्याची सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे जाणून घेवूया.

 

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही युपीआय इनेबल अ‍ॅप जसे की BHIM, Paytm, GPay, PhonePe इत्यादीसारखे अ‍ॅप असले पाहिजे. या अ‍ॅप्सद्वारे तुम्ही पैसे काढू शकता.

 

अवलंबा या स्टेप
प्रथम एटीएममध्ये जा आणि कार्डशिवाय पैसे काढण्याचा पर्याय निवडा.
येथे युपीआयद्वारे ओळख प्रदान करण्याचा पर्याय दिसेल.
आता मोबाईलवर युपीआय अ‍ॅप ओपन करा.
समोर दिसणारा QR कोड स्कॅन करा.
आता युपाआयद्वारे प्रमाणीकरण केले जाईल. पुढील प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असेल.
तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका आणि तुमचे पैसे काढा.

कोणते तंत्रज्ञान वापरले जाते?
रिझर्व्ह बँक लवकरच NPCI, ATM नेटवर्क आणि बँकांना एटीएममधून डेबिट कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करेल. या सुविधेसाठी युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआयचा वापर केला जाईल. युपीआयद्वारे ग्राहकांची ओळख पटवली जाईल आणि अशा व्यवहाराचे पेमेंट एटीएम नेटवर्कद्वारे केले जाईल. यामुळे बँकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

 

विना कार्ड पैसे काढण्याचे फायदे
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले की, कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा अतिशय फायदेशीर आहे. कार्डशिवाय पैसे काढण्याच्या सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग यांसारख्या फसवणुकीला आळा बसेल. तसेच कार्ड सोबत ठेवण्याचीही गरज भासणार नाही. हे सर्व काम स्मार्टफोन करेल.

 

Web Title :- ATM | how to withdraw cash without using atm card in sbi pnb and other banks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा; आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी