Video : खळबळजनक ! यवतमध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस’ ; लाखोंची ‘कॅश’ भरलेलं मशिन स्कॉर्पिओला बांधून पळवलं

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – चोरट्यांनी चक्क स्कॉर्पिओला बांधून एटीएम मशीनच लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार दौंड तालुक्यातील यवत येथे रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. एटीएम मशीनमध्ये लाखोंची रोकड होती. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दौंड तालुक्यातील यवतमध्ये असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी लंपास केले आहे. काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास चोरटे स्कॉर्पिओ गाडी घेऊन आले. त्यांनी एटीएम मशीन स्कॉर्पिओला बांधून चक्क उखडून पळवले. त्यात एटीएम केंद्राचे नुकसान झाल्याचे दिसते. तर मशीन लाखो रुपयांच्या रकमेसह पळविण्यात आली.

या घटनेने यवतमध्ये एकच खळबळ उडाली तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर लागलीच चोरट्यांचा शोध सुरु केला. गाडी कोणत्या दिशेने गेली. कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का याची चौकशी पोलिसांनी केली. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा –

https://youtu.be/WXEKmMNdWzM

आरोग्यविषयक वृत्त –

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स 

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु 

 

Loading...
You might also like