एटीएम मशीन्सच्या की-पॅडवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु

पोलीसनामा ऑनलाइन – बँकेत जाण्यापेक्षा अनेकजण एटीएमचा सर्वाधिक वापर करतात. काही वेळा तर दिवसातून दाने अथवा त्यापेक्षा जास्त वेळा एटीएमवर पैसे काढण्यासाठी जावे लागते.परंतु, याच एटीएम मशीनवर गंभीर आजार पसरवणारे अनेक किटाणु असतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

एका रिसर्चमधून असे आढळले की, मोबाईल फोनच्या स्क्रिनवर टॉयलेट सीटएवढे बॅक्टेरिया असतात. हे समजल्यानंतर अनेकांनी फोनची स्क्रिन डिसइन्फेक्टेंटचा वापर करून स्वच्छ करण्यास सुरूवात केली. मात्र, आता आणखी एका रिसर्चमधून असे समोर आले आहे की, एटीएम मशीन्सवरही टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु असतात. हेच किटाणु अनेक गंभीर आजार पसरवतात.

एटीएम मशीन्स सध्याची गरज बनल्या असून प्रत्येक ठिकाणी एटीएम मशीन्स असल्यामुळे लोक जास्त रोख रक्कम काढत नाहीत. जेवढ्या रोख रक्कमेची गरज असेल तेवढेच पैसे काढले जातात. यामुळे एटीएम मशीन्सचा वापर खूपच वाढला आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एटीएम मशीन्सच्या की-पॅड्सवर पब्लिक टॉयलेट सीट्सप्रमाणे किटाणु असतात.

ब्रिटनच्या रिसर्चर्सनी एटीएम मशीन्स आणि पब्लिक टॉयलेट्सचे स्वॅब्स घेतले आणि त्यांची तुलना केली. दोन्ही स्वॅब्समध्ये असे किटाणु आढळून आले. ज्यामुळे डायरियाप्रमाणे घातक आजार होऊ शकतात. मायक्रोबायोलॉजिस्ट रिचर्ड हैसिंग यांनी सांगितले की, हे परिणाम पाहून त्यांनाही आश्चर्यच वाटले. एटीएम मशीनवर तसेच बॅक्टेरिया होते, जसे एका पब्लिक टॉयलेटमध्ये होते. हे संशोधन एका अ‍ॅन्टीबॅक्टेरियल प्रॉडक्ट्स विकणाऱ्या एका बायोकोटद्वारे करण्यात आले होते.