ATM मशीनमधून आता निघणार नाहीत 2 हजार रूपयांची नोट, जाणून घ्या कारण

गोरखपूर : आता एटीएममधून दोन हजार रूपयांची नोट मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रूपयांच्या नोटा मिळणे सध्या बंद झाले आहे. बँका सुद्धा एटीएम मशीनमधून दोन हजार रूपयांच्या नोटांचे कॅलिबर काढू लागल्या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने यास सुरूवात केली आहे. सेंट्रल बँकेने आपल्या 58 एटीएम मशीनमधून कॅलिबर काढले आहे. इतर बँकांचे सुद्धा म्हणणे आहे की, आता एटीएममध्ये केवळ 100, 200 आणि 500 रुपयांच्याच नोटा लोड केल्या जातील.

सेंट्रल बँकेचे मंडल प्रमुख एलबी झा यांनी म्हटले की, अनेक महिन्यांपासून आरबीआयकडून दोन हजारच्या नोटा मिळत नाहीत. बाजारातून सुद्धा शाखांमध्ये दोन हजारच्या नोटा खुप कमी येत आहेत. असे सुद्धा समजत आहे की, आरबीआयने दोन हजारच्या नोटांची छपाई बंद केली आहे. दोन हजारच्या नोटेचे संकट पहाता क्षेत्रातील 58 एमटीएम मशीनमधून दोन हजारच्या नोटेचे कॅलिबर हटवून 500चे लावण्यात आले आहे. जेणेकरून जास्त नोटा लोड करता येतील.

यूनियन बँकेचे म्हणणे आहे की, एटीएम मशीनमध्ये 500, 200 आणि 100 च्या नोटाच टाकल्या जात आहेत. आरबीआयकडून दोन हजारची नोट येण्याची शक्यता वाटत नाही. कारण मागील पाच महिन्यात एकदा सुद्धा दोन हजारचे बंडल आलेले नाहीत. बडोदा युपी बँकेचे रिजन -एकचे क्षेत्रीय व्यवस्थापक अखिलेश सिंह म्हणाले, आरबीआयकडून दोन हजारच्या नोट येत नसल्याने मोठे पैसे काढणार्‍या खातेधारकांना सुद्धा 500 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. पीएनबीचे एजीएम संतोष कुमार यादव म्हणाले, दोन हाजारच्या नोटांचे संकट प्रत्येक ठिकाणी आहे. शाखांमध्ये जमा करण्यासाठी येणारी दोन हजार रूपयांची नोट एटीएममध्ये भरता येणार नाही.

You might also like