पुण्यात गणेशोत्सवात आता एटीएम म्हणजे एनी टाइम मोदक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

तंत्रज्ञान आणि संस्कृतीला एकत्र सुरेख संगम साधत एका पुणेकराने मोदकाचा प्रसाद देणाऱ्या  एटीएम मशीनचा शोध लावला आहे .  शंकर नगरमध्ये राहणाऱ्या संजीव कुलकर्णी या व्यक्तीने  एटीएम (एनी टाइम मोदक) मशीन विकसित केले आहे .

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’489b455a-bb3b-11e8-a19f-e9a9e16032a1′]
 गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात या खास एटीएम मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. एका विशिष्ट कार्डच्या साहाय्याने तुम्ही या मशीनमधून चक्क मोदक मिळवू शकता. पुण्याच्या शंकर नगरमध्ये या खास ‘एटीएम’ (एनी टाईम मोदकची) निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या गणपती स्पेशल एटीएम मशीनचा व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे. कार्ड स्वाईप केल्यानंतर भक्तांना मोदकाचा प्रसाद देणाऱ्या या अनोख्या एटीएम मशीनची सर्वत्र चर्चा होत आहे .

गणेश मूर्तींचे हौदातच विसर्जन करावे : आयुक्त श्रावण हर्डीकर

बॅंकेच्या एटीएम मशीनच्या बटणांवर १ ते ९ आकडे असतात. मात्र, या एटीएम मशीनमध्ये बटणांवर जागी दान, क्षमा, शांती, सदाचार, प्रेम, भक्ती, भावना, ज्ञान, स्नेह, सुख, निष्ठा, मोद आणि समाधान हे शब्द लिहीले आहेत. या मशीनमध्ये वापरण्यासाठी एका खास एटीएम कार्डाचीही निर्मिती केली आहे. हे कार्ड मशीनमध्ये टाकून कुठलेही बटण प्रेस केले की मोदकाची एक छोटी डबी बाहेर येते. या डबीच्या आतमध्ये एक छोटासा मोदक आधीपासूनच असतो. मशीनमधून बाहेर येणाऱ्या मोदकाच्या प्रत्येक डबीवर ‘ओम‘ लिहिलेले असते. दरम्यान तंत्रज्ञान आणि संस्कृतीला एकत्र पुढे नेण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं या एटीएम निर्माते संजीव कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.