इस्लामपूर : एटीएम सेंटरवर १२ लाखांचा दरोडा

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन

इस्लामपूर येथील कोल्हापूर रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडीयाच्या एटीएम सेंटवर दरोडा टाकून ११ लाख ४५ हजार ६०० रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांच्या मागावर पथक पाठवले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5534e2db-cee2-11e8-bc4f-ab06487433b2′]

इस्लामपूर येथील कोल्हापूर रोडवर बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडले. चोरट्यांनी मशीनमध्ये असेलेली रोकड चोरुन नेली. रोकड चोरून नेत असताना घटनास्थळावर ८० हजारांच्या नोटा पडल्या होत्या. हे चोरटे स्कॉर्पीओ गाडून आले होते. एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून एकूण तीन चोरटे रोकड चोरताना दिसत आहेत.

अबब… खंडोबाचेच दागिने वितळवून केला जेजुरीचा कळस ?

चोरीचा हा प्रकार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला. एटीएममध्ये एकूण १२ लाख २५ हज‍ार ६०० रुपयांची रोकड होती. त्यामध्ये ५०० च्या २१८४, २००० च्या ६६ व १०० च्या १६ नोटा होत्या. चार वर्षापूर्वी देखील हेच मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र, ते परीसरातच घुटमळले. एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून ही चोरी करण्यात आली. पोलीसांनी चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9833c320-cee2-11e8-95bb-a73b3ef6b598′]