ATM Rule Change | मोठी बातमी ! ATM मधून कॅश काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा अडकतील पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ATM Rule Change | एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमात बदल झाला आहे. SBI ने एटीएमद्वारे ट्रांजक्शन आणखी सुरक्षित बनवण्यासाठी एक नवीन उपक्रम राबवला आहे. आता एसबीआय एटीएममधून कॅश काढण्यासाठी तुम्हाला ओटीपी नोंदवण्याची गरज असेल. या नवीन नियमानुसार, ग्राहक विना ओटीपी कॅश काढू शकणार नाहीत. कॅश काढताना ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल जो टाकल्यानंतरच एटीएममधून कॅश काढता येऊ शकते. (ATM Rule Change)

 

बँकेने ट्विट करून दिली माहिती

 

बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, एसबीआय एटीएममध्ये व्यवहारासाठी आमची ओटीपी आधारित रोकड प्रणाली फसवणुक करणारांविरूद्ध लसीकरण आहे. तुम्हाला यापासून वाचवणे नेहमी आमची सर्वोच्च प्राथमिकता असते. एसबीआयच्या ग्राहकांना याबाबत माहिती असावी की, ओटीपी आधारित रोकड काढण्याची प्रणाली कशी काम करेल. 10,000 आणि त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू असेल.

 

जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

 

  • एसबीआय एटीएममधून रोकड काढण्यासाठी एक ओटीपी (OTP) ची गरज असेल.
  • यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
  • हा ओटीपी एक चार अंकाचा क्रमांक असेल जो ग्राहकांना सिंगल ट्राजक्शनसाठी मिळेल.
  • रक्कम नोंदवल्यानंतर, एटीएम स्क्रीनवर ओटीपी टाकण्यास सांगितले जाईल.
  • कॅश काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेसोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर प्राप्त ओटीपी नोंदवावा लागेल.

 

Web Title : ATM Rule Change | atm rule change sbi offers otp based cash withdrawal from atm check here benefits and process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 536 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Airport | पुणे विमानतळ 1 डिसेंबर पासून 24 X 7 सुरु राहणार

Indian Railway | देशात पहिल्यांदा मातीच्या डोंगराखाली रेल्वे बनवत आहे सर्वात मोठा बोगदा, जाणून घ्या कुठे?