चोरट्यांनी चक्‍क बँकेचे ATM मशिनच ‘गायब’ केलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-औरंगाबाद महामार्गावर शेंडी बायपास येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून वाहनातून चोरून नेले आहे. एटीएममध्ये १ लाख २ हजार रुपयांची रोकड होती, असे बँक व्यवस्थापकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शेंडी बायपासजवळ इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेजवळ एटीएम मशीन आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून एटीएममध्ये प्रवेश केला आहे. एटीएम सेंटरमधील मशीन काढून ते वाहनातून घेऊन चोरटे पसार झाले.

रविवारी सकाळी गावातील लोकांनी एटीएमचे शटर तोडल्याचे बघितल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे