चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच नेले चोरुन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बीड औरंगाबाद बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोरील एस बी आयचे एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरुन नेले. या एटीएम मशीनमध्ये लाखो रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड बायपास हा अतिशय वर्दळीचा रोड असून त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वस्ती आणि व्यापारी संकुल, मंगल कार्यालये आहेत. दत्त मंदिरासमोर स्टेट बँकेचे एटीएम सेंटर अनेक वर्षांपासून आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसतो. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी या एटीएम सेंटरमधील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य न झाल्याने त्यांनी चक्क एटीएम मशीन चोरुन नेली. त्यासाठी त्यांनी चारचाकीचा वापर केला असावा.

शनिवारी सकाळी जेव्हा या भागात वर्दळ सुरु झाली. तेव्हा लोकांना याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना कळविले. या एटीएम मशीन मध्ये किती रक्कम होती, हे अद्याप समजू शकले नाही.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like