ATM Transaction Fee | बदलला एटीएममधून कॅश काढण्याचा नियम, जाणून घ्या फ्रीमध्ये किती काढू शकता ‘कॅश’

नवी दिल्ली : सामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. त्यातच आता बँकांकडून एटीएम ट्रांजक्शन चार्जमध्ये (ATM Transaction Fee) वाढ करण्यात आली आहे. बँकांनी हे पाऊल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशाचे पालन करण्यासाठी उचलले आहे. आरबीआयने सुमारे 9 वर्षानंतर एटीएम ट्रांजक्शन (ATM Transaction Fee) मध्ये वाढ केली आहे.

आता तुम्हाला एटीएममधून कॅश काढण्यावर पहिल्यापेक्षा जास्त चार्ज द्यावा लागेल. बँकेने इंटरचेंज फीमध्ये वाढ केली आहे. इंटरचेंज शुल्क बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट प्रोसेस करण्यासाठी मर्चंटकडून घेते. याबाबत संसदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किसनराव कराड यांनी माहिती दिली आणि म्हटले की आरबीआयने 1 जानेवारी 2022 पासून बँकांना कस्टमर चार्ज म्हणून 21 रुपये वसूल करण्याची सूट दिली आहे. सध्या हा चार्ज 20 रुपये आहे.

शुल्काविना किती वेळा काढू शकता कॅश

आरबीआयच्या निर्देशानुसार, खातेधारक आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्यात 5 वेळा फ्री
ट्रांजक्शन करू शकतो. तर तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा आपल्या बँकेच्या एटीएममधून नॉन कॅश
ट्रांजक्शन करू शकता. तर दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून तुम्ही महिन्यात 3 ते 5 वेळा फायनान्शियल
आणि नॉन फायनान्शियल ट्रांजक्शन करू शकता. यावेळी तुम्हाला प्रत्येक ट्रांजक्शनसाठी चार्ज
द्यावा लागेल. बँकिंग नियमानुसार मेट्रो शहरात दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून 3 वेळा फ्री ट्रांजक्शनची
सुविधा आहे.

बँका वाढवू शकतात ट्रांजक्शन लिमिट

संसदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटले की, हे आवश्यक नाही की बँकांद्वारे एटीएम ट्रांजक्शनसाठी चार्ज वसूल केला जावा, हे बँकांवर अवलंबून आहे, जर त्यांची इच्छा असेल तर ते ट्रांजक्शन लिमिट वाढवू शकतात.

हे देखील वाचा

Pune Rural Police | शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस; 3 आरोपींकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस

Gold Silver Price Today | सोनं 210 रुपये तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ATM Transaction Fee | bank increased atm transaction fee know how many times you can withdraw money from atm free of cost

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update