आता ATM वर येणार ‘निर्बंध’, 6 ते 12 तासानंतर काढता येणार पैसे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांचा बँक शाखांमध्ये येणारा ओघ कमी करण्यासाठी बँकांनी विविध प्रकराच्या सुविधा आणि सेवा ‘एटीएम’मार्फत उपलब्ध करून दिल्या आहेत. एटीएममध्ये स्कीमर, हॅकिंग करून अनेक ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी ‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने शिफारसी सुचवल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने सुचवलेल्या शिफारसी –
‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने सुचवलेल्या शिफारसी लागू झाल्यानंतर ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेळेची बंधनं येणार आहेत.एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना ६ ते १२ तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’चे निमंत्रक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी आणि सीईओ मुकेश कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएम मशीनद्वारे होणारी फसवणूक, लूट मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत करण्यात येते. त्यामुळे एटीएम व्यवहारावर बंधने घालण्याचा पर्याय समोर आला. तसेच अनधिकृतपणे पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्यास ग्राहकांना ओटीपी पाठवून अलर्ट करावे या विषयीही विचार केला जात आहे.

वर्ष २०१८-१९ मध्ये देशभरात एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती तर महाराष्ट्रात २३३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी दिल्लीत १८ बँकांच्या प्रतिनिधींसोबत ‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने चर्चा केली. या चर्चेतून एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये वेळेचे बंधन घालण्याचा मुद्दा समोर आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –