आता मोदी सरकार 2 वर्षापर्यंत भरणार तुमचा PF, जाणून घ्या कुणाला मिळणार फायदा ?

नवी दिल्ली : कोरोना महामारीत सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. सरकारने चौथ्या मदत पॅकेजमध्ये आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुद्धा सुरूवात केली आहे. कर्मचारी आणि रोजगारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. सरकारने सांगितले की, ही स्कीम 1 ऑक्टोबर 2020 ला लागू मानली जाईल आणि ही योजना 30 जून 2021 पर्यंत राहील. या योजनेचा कुणाला फायदा मिळेल ते जाणून घेवूयात…

कोणत्या लोकांना मिळेल फायदा
या योजनेचा हेतू रोजगाराला प्रोत्साहन देणे आहे. या अतंर्गत कंपन्या नव्या लोकांना रोजगार देत आहेत, म्हणजे जे अगोदरपासून ईपीएफओमध्ये कव्हर नव्हते त्यांना याचा फायदा मिळेल. महिना 15,000 रुपयांपेक्षा कमी सॅलरीवाले किंवा 1 मार्च 2020 पासून 31 सप्टेंबर 2020 च्या दरम्यान नोकरी गमावणार्‍या लोकांना याचा फायदा मिळेल.

या योजनेंतर्गत त्या लोकांना ईपीएफओशी जोडले जाईल जे अजूनपर्यंत यामध्ये रजिस्टर्ड नव्हते. या योजनेंतर्गत ईपीएफओशी संबंधीत कर्मचार्‍यांच्या भविष्य निधी (पीएफ) मध्ये दोन वर्षापर्यंत पूर्ण 24 टक्के भाग सरकार देईल.

असा मिळेल फायदा
सरकार पुढील दोन वर्षापर्यंत सबसिडी देईल. ज्या संस्थेत 1000 पर्यंत कर्मचारी आहेत, त्यामध्ये 12 टक्के कर्मचारी आणि 12 टक्के कंपनीचा भाग केंद्र सरकार देईल. 1000 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या संस्थांमध्ये केंद्र कर्मचार्‍याच्या भागातील 12 टक्के देईल. 65 टक्के संस्था यामध्ये कव्हर होतील.

कंपन्यांसाठी अटी
यासाठी आधार यूएएन नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे. या योजनते काही अटी कंपनीसाठी सुद्धा आहेत. सरकार एकुण 24 टक्के पीएफ काँट्रीब्यूशन तिथे करेल ज्या कंपनीत 1 हजार कर्मचारी आहेत. एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीत सरकार केवळ 12 टक्के कर्मचार्‍यांचा भाग काँट्रीब्यूट करेल.

You might also like