मानवी संभोगाला वातावरण ही लागते सुखकर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्त्री आणि पुरुष मानवाच्या दोन जाती आहेत. यांच्यातील शरीर संबंध मानव जातीच्या नवनिर्मितीचे साधन असून मानसिक संतुलनाचे हि मिलन हे साधन आहे हे मानसशास्त्रीय संशोधनातून समोर आले आहे. मानवी मिलन झाल्यास मानवाला आत्मिक समाधान मिळते तर मानवाच्या मिलनाला वाटेवर हे सुखकर असण्याची खूप आवश्यकता असते हे समोर आले आहे.

सुखकर वातावरणाची कारणे 
मानवाचे मिलन होण्यासाठी स्त्रीची बाहेरील सुंदरता आणि पुरुषाची संभोग क्षमता एवढ्याच बाबी महत्वाच्या नसतात तर सभोवतालचे वातावरण हि चांगले  असणे महत्वाचे असते. किंसले इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशोधना वरून असे सिद्ध झाले आहे कि, शरीर संबंधानंतर तृपीच्या पातळीवर जाण्यासाठी फक्त शारीरिक क्षमताच महत्वाची नसते तर शरीर संबंध ज्या ठिकाणी प्रस्तापित होतात त्या ठिकाणचे वातावरण हि महत्वाचे असते.

वातावरणाचा प्रभाव संभोगावर पडतो 
संशोधना दरम्यान ५०% महिलांनी हे मान्य केले आहे कि संभोगावेळी वातावरण अनुकूल असेल तरच परमोच्च आनंद उपभोगता येतो. अन्यथा माणसाला संभोगातून समाधान मिळू शकत नाही. या शोधाचे मुख्य डॉ. होल्सटेज  यांनी सांगितले कि संभोगाच्या वेळी संतुलित वातावरण अत्यंत महत्वाचे ठरते कारण मानवी मानसिकतेशी संभोगाचे फार जवळचे संबंध असतात म्हणून संभोग वेळी वातारण चांगले ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

आनंदात तडजोड करू नका 
संभोगावेळी जोडीदारासोबत नेहमी दोघांच्या विचाराने क्रीडा करत जा. संशोधनात सहभागी काही महिलांनी सांगितले कि जोडीदाराला आनंद देण्यासाठी आम्ही काही प्रणयक्रीडांची तडजोड करतो परंतु वास्तविक आम्हाला त्या प्रणयक्रीडातून त्रास होतो. म्हणून प्रणय क्रीडेतून आपल्या जोडीदाराला त्रास होणार नाही अशा प्रणयक्रीडांची निवड करावी.

घाई गरबड करू नका  
संभोगाच्यावेळी गरबड केल्यास संभोगातून पुरुषाला सुख मिळेल परंतु स्त्रीला सुख मिळेलच असे नाही म्हणून संभोग करताना वेळ घ्या जेणे करून जोडीदाराला आनंद मिळेल. संशोधनात सहभागी झालेल्या महिलांना या संदर्भात विचारले असता त्यांनी या संदर्भात सांगितले कि संभोग १० मिनिटापेक्षा कमी झाल्यास महिलांना सुख मिळत नाही म्हणून पुरुषांनी जोडीदाराच्या भावनेची कदर करणे गरजेचे असते.