आता सुरू होणार ‘कॅश’ची होम डिलिव्हरी, तुमच्या घरापर्यंत पोहचणार ‘पैसे’, ATM सेंटरला जाण्याची नाही गरज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. अशात सामान्य लोकांसमोर सर्वात मोठी अडचणी आहेत, ती म्हणजे वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे रोख रक्कम नाही. रोख रक्कमेच्या या अडचणीचा सामना करण्यासाठी केरळ सरकारने एक खास पाऊल उचलेले आहे जेणेकरुन सामान्य लोकांना रोख रक्कमेची कमतरता भासणार नाही. या राज्याच्या एटीएमने लोकांना कॅश पुरवण्यासाठी पोस्टल विभागाशी टाइअप केले आहे. म्हणजेच आता कॅशची होम डिलीवरी केली जाईल.

8 एप्रिलपासून सुरु होणार ही सेवा –

केरळ राज्याचे अर्थमंत्री डॉ. टी एम थॉमस यांनी सोमवारी सांगितले की या योजनेंतर्गत एका विशेष क्षेत्रात पोस्टमॅन घरो घरी जाऊन कॅश पोहोचवेल. थॉमस यांनी सांगितले की, 8 एप्रिलनंतर तुम्ही परिसरातील पोस्ट ऑफिसला कॉल करुन आपल्या बँकेचे नाव, रक्कम आणि पत्ता सांगू शकतात. यानंतर पोस्ट ऑफिस तुमच्याघरी तुमचे पैसे पोहोचवेल.

कोणाकोणाला मिळेल फायदा –

मिळालेल्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा 93 बँकेचे ग्राहक घेऊ शकतात. ज्यांनी आधार इनेबल्ड पेमेंट सर्विससाठी आपले आधार बँक खात्याला जोडले आहे. थॉमस म्हणाले की यामुळे डायरेक्ट बेनिफिशयरी ट्रान्सर सुविधेत मोठी क्रांति होईल. याअंतर्गत सोशल वेलफेअर योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना बँक शाखा आणि एटीएम मध्ये जाऊन कॅश काढण्याची आवश्यकता भासणार नाही.

कसे काम करणार सिस्टम –

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आधार इनेबल्स पेमेंट सिस्टम सर्विस सुरु केली गेली होती. या सुविधेला इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून केले जाईल. डोरस्टेप कॅश डिलीवरीसाठी पोस्टमनकडे एक डिवाइस असेल. ज्यात आधार नंबर टाकावा लागेल. यानंतर ग्राहक आपल्या फिंगरप्रिंटद्वारे वैध ठरतील, याआधारे ग्राहकांना कॅश दिली जाईल. ग्राहक 10 हजार रुपये कॅश होम डिलीवरी मागवू शकतात.

सुरक्षेची काळजी –

या बायोमेट्रिक डिवाइसला सॅनिटाइजरने साफ केले जाईल. मंत्र्यांनी सांगितले की या कामासाठी पोस्ट विभागाने पर्याप्त सॅनिटाइजरची खरेदी केली आहे. पोस्टमॅनच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.