Atopic Dermatitis | त्वचेशी संबंधीत गंभीर आजार आहे अ‍ॅटोपिक डर्माटायटिस, एक्सपर्टकडून जाणून घ्या याबाबत सर्वकाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अ‍ॅटोपिक डर्माटायटिस (Atopic Dermatitis), एक्झिमाचा सर्वात सामान्य प्रकार, याला अ‍ॅटोपिक एक्झामा (Atopic Eczema) देखील  म्हणतात. हा प्रामुख्याने मुलांमध्ये उद्भवतो, परंतु पौगंडावस्थेपर्यंत टिकून राहू शकतो. एक्जिमा (Eczema) ही खाज सुटणे (Itching), लालसरपणा (Redness), कोरडेपणा (Dryness) किंवा त्वचेला तडे जाणे (Skin Rash) यासारख्या लक्षणांची स्थिती आहे. कधीकधी यातून द्रव किंवा रक्त देखील बाहेर (Atopic Dermatitis) येते.

 

यामुळे निद्रानाश (Insomnia), कमी आत्मविश्वास (Low Confidence), नैराश्य (Depression) आणि जीवनाचा दर्जा खराब (Poor Quality Of Life), शाळेत किंवा कामात खराब कामगिरी यासारख्या इतर मानसिक समस्या (Mental Problems) उद्भवू शकतात. जगातील 20 टक्के मुले आणि 3 टक्के प्रौढांना एडी (Atopic Dermatitis) आहे.

 

अ‍ॅटोपिक डर्माटायटिस म्हणजे काय (What Is Atopic Dermatitis)?
2 टर्शरी हॉस्पिटल्समधील डर्मोटोलॉजी कन्सल्टंट डॉ. नीना मदनी (Dr. Nina Madani) म्हणतात, दर पाच मुलांपैकी एकाला अ‍ॅटोपिक डर्माटायटिस (AD) आहे, ज्याला अ‍ॅटोपिक एक्जिमा (Atopic Eczema) असेही म्हणतात. हा एक सामान्य आणि जुनाट आजार आहे ज्याने त्वचा लाल होते आणि खाज सुटते आणि जळजळ होते.

 

हा आजार साधारणपणे लहान वयात सुरू होतो, परंतु काही लोकांमध्ये हा आजार प्रौढ होईपर्यंत टिकून राहतो आणि काही लोकांमध्ये या आजाराची लक्षणे प्रौढ होईपर्यंत दिसून येत नाहीत. एडी सामान्यत: लहान मुलांमध्ये कोपराच्या पुढच्या बाजूला किंवा गुडघ्याच्या मागे होतो, परंतु त्याचा चेहरा (Face), घसा (Throat), डोके (Head), मनगट (Wrist) आणि संपूर्ण शरीरावर देखील परिणाम होऊ शकतो.

 

रॅशेस सौम्य ते गंभीर असू शकतात आणि पीडित व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता कमी करू शकतात. त्वचेच्या या गंभीर आजाराच्या शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त, दमा, निद्रानाश, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक समस्या देखील रुग्णाला उद्भवू शकतात.

 

सौम्य एडी असलेल्या प्रौढांना देखील या रोगामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो आणि त्यांना चिंता, नैराश्याचा धोका वाढू शकतो आणि समाजात एकटे राहिल्यास ते आत्महत्या देखील करू शकतात.

रूग्ण करतात अशा समस्यांचा सामना (AD Patients Face These Problems)
आयजेडी (IJD) आणि आयजेएसएमध्ये (IJSA) असिस्टंट प्रोफेसर, सीएनएमसी आणि असिस्टंट एडिटर डॉ. अभिषेक डे (Dr. Abhishek Dey) म्हणाले की, अनियंत्रित, सौम्य किंवा गंभीर अ‍ॅटोपिक डर्माटायटिस असलेल्या रुग्णांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.

 

रोगाच्या अनिश्चित अवस्थेमुळे मधूनमधून जळजळ होते, ज्यामुळे रुग्णांमध्ये घबराट निर्माण होते आणि ते समाधानकारक जीवन जगू शकत नाहीत. या आजाराने ग्रस्त मुले आणि प्रौढांना झोपेची समस्या (Sleep Problem) असू शकते. वारंवार थांबून-थांबून जळजळ होत असल्याने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत ती मागे पडतात.

 

एडीचा मुलांच्या आणि प्रौढांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो. मुलांच्या मनात त्यांची कमकुवत प्रतिमा रुजते आणि एडीला नियंत्रित करणे कठीण जाते. त्यांच्यातील आत्मविश्वासाच्या अभावामुळे सामाजिक कौशल्यांवरही परिणाम होतो. पण योग्य पाठबळ आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा रोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो.

 

मुले होतात चिडचिडी – नोकरी मिळण्यात येते अडचण (Children Become Irritable – There Is A Problem In Employment)

कोलकाताच्या इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थच्या (Kolkata Institute of Child Health) डर्माटॉलॉजिस्ट विभागाचे प्रोफेसरआणि हेड डॉ. संदीपन धर (Dr. Sandipan Dhar) म्हणाले,
या आजारामुळे तणाव, भावनिक नैराश्य, सामाजिक कलंक, लाजिरवाणे वाटणे आणि दैनंदिन कामे मर्यादित होतात.
हा एक जुनाट आजार आहे, ज्यामध्ये शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो कारण त्यावर कोणताही उपाय नाही.

सौम्य किंवा गंभीर अ‍ॅटोपिक डर्माटायटिस असलेल्या रुग्णांना जीवनशैलीत कठोर बदल आवश्यक असतात.
शरीराच्या कोणत्या भागावर अ‍ॅटोपिक डर्माटायटिसने पीडित आहे या आधारावर व्यक्तीच्या कामावर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
परिणामी, एडी असलेल्या प्रौढांसाठी रोजगाराच्या संधी शोधणे अनेकदा कठीण होते.

 

जे रूग्ण नोकरी करूशकत नाहीत त्यांना आर्थिक समस्या (Financial Problems) सतावू शकतात,
ज्यामुळे त्यांच्या उपचारांवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो.
दैनंदिन गरजांसाठी अपुर्‍या पैशामुळे नैराश्य आणि नियमित आर्थिक आव्हाने येतात.

 

दुसरीकडे, एडी ग्रस्त मुले, त्वचेवर जळजळ आणि खाज यामुळे चिडचिडी (Irritability) होतात आणि लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
त्यांचा स्वाभिमान कमी होतो, लाजिरवाणे वाटत असल्याने ती इतर मुलांबरोबर मिसळू शकत नाहीत आणि त्वचेच्या समस्यांमुळे त्यांची थट्टा केली जाते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Atopic Dermatitis | what is atopic dermatitis know what experts say about it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | नारायणगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक; गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त

 

Sunny Leone Injured Photo | सनी लिओनीचा ऑपरेशन टेबलवरील जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल, चाहत्यांना चिंता

 

Multibagger Penny Stocks | 2 महिन्यांपूर्वी गुंतवले असते 1 लाख तर ‘या’ स्टॉकने बनवले असते 8.63 लाख रुपये