घृणास्पद ! नराधम बापाकडून पोटच्या ५ वर्षीय मुलीवर अत्याचार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पोटच्या ५ वर्षाच्या मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार साताऱ्यात समोर आला आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिराळा तालुक्यातील असलेले पिडीत मुलीचे कुटुंबिय साताऱ्यात एका पेठेमध्ये राहण्यास आहेत. दोन दिवसांपुर्वी मुलीला काही त्रास होत असल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा मुलीने तिच्याकडे वडिलांनी केलेल्या धक्कादायक प्रकाराची कहाणी सांगितली. मात्र त्यानंतर आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी वडिलांविरोधात बाललैंगिक अत्याचारप्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेलार तपास करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत