पत्नीच्या संमतीने पतीने केले तरुणीवर अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – लग्न झाले असताना पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे खोटे सांगून तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार मोशी येथे घडला.

धनंजय पोपट लोमटे (४२) व त्याची पत्नी मनीषा लोमटे (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय आणि मनीषा हे पती-पत्नी आहेत. धनंजय याने पीडित तरुणीशी मैत्रीचे संबंध जोडले. पीडितेला धनंजय याने सांगितले की, ‘मी माझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर आपण लग्न करू.’ असे आमिष दाखूवन आरोपीने २१ फेब्रुवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पीडितेवर अत्याचार केले. यावेळी धनंजयची पत्नी हिनेही त्याला प्रोत्साहन दिले. मात्र् त्यांनी घटस्फोट न घेता पीडितेची फसवणूक केली. तपास पोलीस करीत आहेत.