महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण, दोघांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ तालुक्यातील पाटण या गावातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात महिला सरपंचाला जातीवाचक शिवगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात मारहाणीसह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. रुपाली मंगेश पाटेकर असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास रुपाली पाटील ह्या त्यांच्या घराच्या ओट्यावर काम करीत होत्या त्यावेळेला त्याठिकाणी शंकर तिकोणे व बबन तिकोणे आले. त्यांनी रुपाली यांना जातीवाचक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी रुपाली यांचे कुटुंबीय त्यांच्या सासूबाई इंदाबाई पटेकर व सासरे मारुती पटेकर भांडण सोडवण्यासाठी पुढे आले मात्र त्यांना देखील शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. तसेच पाटेकर यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ढकलून देत जखमी देखील करण्यात आले. याबाबत रुपाली मंगेश पाटेकर यांनी पाटण गावातीलच शंकर दिनकर तिकोणे व बबन भवानजी तिकोणे यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. या वादामागे नेमके कोणते कारण आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

याप्रकरणी पटेकर यांच्या तक्रारीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे तपास करत आहेत.