नगरसेविकेच्या पतीविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांनी मारहाण करीत धक्काबुक्की केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अभिजित हारगे याच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल तक्रार दिली.

थोरात यांच्या तक्रारीवरून अभिजित हारगे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका संगीता हारगे, व स्वाती पारधी हे मिरजेच्या प्रभाग २० मधून राष्ट्रवादीतून निवडून आलेले आहेत. सौ. हारगे आणि पतीराज अभिजित हारगे प्रभागात वरचष्मा आहे. प्रभागातील कामे त्यांना विचारूनच केली जावीत असा हारगे दांपत्याचा दबाव असल्याचा थोरात यांचा आरोप आहे. यावरून हारगे यांनी अधिकार्‍यांना दमात घेतले.

यावेळी थोरात तेथे आले होते. त्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु थोरात यांना हारगे यांनी मधे न पडण्याबद्दल सुनावत दमात घेतले. यावरून थोरात ही संतप्त झाले, त्यांनी हारगे यांना तुम्ही नगरसेवक नाही, तुम्ही अधिकार्‍यांना कशासाठी दाब दाखविता, असा जाब विचारला. यातून वाद वाढत गेला. संतप्त झालेल्या अभिजित हारगे यांनी थोरात यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली होती.

या मारहाणीत थोरात हे किरकोळ जखमी झाले होते. याबाबत नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आज उपविभागीय पोलीस अधिकरी अशोक वीरकर यांनी घडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. साक्षी पुरावे तपासून त्यांनी आज नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

परिपूर्ण ‘आहारासाठी’ खूपच काटेकोरपणा चांगला नाही

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा