खडकीतील एका संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
अनुसुचित जातीचे असल्याच्या कारणावरुन खडकीतील तामिलियन असोसिएशन संस्थेच्या उपाध्यक्षाला पदावरुन काढून टकून बदनामी केली. बदनामी करणाऱ्या  दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१५ ते २०१६ दरम्यान घडला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f99e4e1-c62c-11e8-96fe-c1561483b593′]
याप्रकरणी ओमप्रकाश रत्नस्वामी (वय-६८ रा. पिंपळे निलख) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सॅम्युअल अल्बर्ट कनकराज आणि डेविड फ्रान्सिस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्य़ादी ओमप्रकाश यांच्या म्हणण्यानुसार ते एक सामाजिक कार्यकर्ता असून ३० वर्षांपासून अनुसचित जातीच्या लोकांसाठी काम करतात. त्यांनी दि साऊथ इंडियन असोसिएशन संस्थेचे (एसवीएस हायस्कूल) उपाध्यक्षपदावर काम केले आहे. आरोपी सॅम्युअल आणि डेविड या दोघांनी त्यांची बदनामी करुन त्यांना उपाध्यक्ष पदावरुन हटवले. तसेच कोनशिल्यावर असलेल्या नावावर काळा रंग लावून नाव पुसून टाकले.
[amazon_link asins=’B00XW4E27S,B00UFF9DXK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3370a0c1-c62c-11e8-8bbb-e971e041a95a’]
आरोपींनी संस्थेचे जुने नाव बदलून तामलियिन असोसोसिएशन खडकी असे केले. जुन्या संस्थेचे कागदपत्रांचा वापर करुन आरोपींनी कॅनरा बँकेत आणि इतर बँकांमध्ये बनावट खाते उघडले आहे. याची माहिती बँकांना न देता संस्थेच्या लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे ओमप्रकाश यांनी दिलेल्या फिर्य़ादेत म्हटले आहे. ओमप्रकाश यांनी दिलेल्या फिर्य़ादेवरुन खडकी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.
Loading...
You might also like