अपंग तरुणाचा चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन 

बाळापूर तालुक्यातील तामशी येथे शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या मुलीवर दोन्ही पायांनी अपंग असलेल्या २३ वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी विजय ऊर्फ बबल्या अशोक इंगळे (वय २३, रा. तामशी) याला अटक केली आहे. दोन्ही पायांनी अपंग असलेला इंगळे हा पिडीत मुलीच्या जवळ राहतो. ही घटना गुरुवारी घडली. शुक्रवारी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5bb1cc81-cea3-11e8-ba5f-0da68ca8a6a9′]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, चार वर्षाची ही मुलगी गुरुवारी ११ आॅक्टोबर रोजी दुपारी घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने मुलीच्या आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून तिला घरात बोलावले. व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली. भीतीमुळे मुलगी गप्प राहिली.

[amazon_link asins=’B07CKDTBSL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bde347a6-cea3-11e8-aff1-072ac00feb62′]

परंतु, रात्री मुलीची प्रकृती बिघडली. नातेवाईक तिला खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा आईने तिला विचारणा केली असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी या प्रकरणाची तक्रार बाळापूर ठाण्यात दिली. बाळापूर पोलिसांनी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिन्यात दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सांगलीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफा