उत्तर प्रदेशमध्ये ‘जैैश-ए-मोहम्मद’शी निगडीत दोघांना अटक

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथेली हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली होती. त्यानंतर देशात अनेक ठिकाणी हाय अर्लट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन जाणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी ही कारवाई केली.


शाहनवज अहमद तेली आणि आकिब अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव आहेत. शाहनवाज हा कुलगाम आणि आकिब हा पुलवामा येथील रहिवासी आहे. हे दोघे जैश-ए-मोहम्मद या संघटनेत तरुणांना भरती करण्याचे काम करतात अशी माहितीत समोर आली आहे.

शाहनवाज आणि आकिब यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन बंदुका आणि काडतुसेही जप्त करण्यात आली. यापैकी शाहनवाज हा बॉम्ब तयार करण्यात तज्ज्ञ आहे, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे.

दरम्यान, १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात भारतीय सैन्याचे ४० जवान शहीद झाले होते.