विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘AK-47’सह मोठा शस्त्र साठा जप्‍त, राज्यभर प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यातच घातपात टाळण्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असतानाच मनोर पोलिसांनी आज पालघरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पालघरच्या मनोर भागात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये तीन AK-47 रायफल्स आणि ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पालघरच्या मनोर परिसरात शस्त्र साठा आणि ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मनोर पोलिसांनी ही कारवाई केली असून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी व्यक्त केली आहे. पालघरमध्ये शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील महिन्यात गुजरातमधील कांडलामध्ये कच्छमार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली होती. या माहितीनंतर सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून समुद्रामार्गे कमांडो किंवा दहशतवादी येऊन हिंसाचार निर्माण करणे किंवा दहशतवादी हल्ले करण्याच प्रयत्न करतील अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.

Visit : policenama.com