वैभव राऊतला घेऊन ATS ची टीम पुन्हा नालासोपाऱ्यात

नालासोपारा (पालघर) : पोलीसनामा आॅनलाईन

घरामध्ये मोठ्याप्रमाणात स्फोटकांचा साठा सापडल्यामुळे अटकेत असलेल्या वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातील घरी परत एटीएसचे पथक दाखल झाले आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे एटीएसच्या पथकासोबत वैभव राऊतला देखील सोबत नेण्यात आलं आहे. राऊत हा सोपारा गवातील भंडार आळीत वास्तव्यास आहे.

वैभव राऊतच्या घरी सर्चिंग आॅपरेशन सुरू असल्यामुळे सोपारा गावात तणावाचं वातावरण आहे. मात्र, वैभव राऊतच्या पत्नीने गावकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी एटीएसने वैभव राऊतच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीची तपासणी केली आणि त्यानंतर गाडी सोबत घेऊनही गेले.

[amazon_link asins=’B00KNOW2SQ,B077WY86ZT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56292c79-a08a-11e8-8486-47a8c1e471c4′]

दरम्यान, 9 ऑगस्टच्या रात्री महाराष्ट्र एटीएसने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती. यावेळी विघातक स्फोटकांचा साठा जप्त केला आणि याप्रकरणी वैभव राऊत यालाही अटक केली. त्यानंतर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. यानंतर राज्यातील विविध भागातून 11 ऑगस्ट रोजी वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या संपर्कात असणाऱ्या 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.