Atta Price Hike | आता चपाती खाणंही महागलं ! गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Atta Price Hike | वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. एकीकडे इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. तर दुसरीकडे जेवणाच्या वस्तुच्या दरात देखील वाढ (Atta Price Hike) होताना दिसत आहे. यामुळे महागाईची झळ सोसावी लागत आहे. गव्हाच्या वाढत्या दरामुळे आता गव्हाच्या पिठात वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षामध्ये मे महिन्यात पिठाचा दर प्रति किलो 29.14 इतका होता. तोच आता किरकोळ बाजारात गव्हाच्या पीठाचा सरासरी दर साधारण 32.91 प्रति किलो इतका झाला आहे.

 

पिठाचा कमाल दर 59 रुपये प्रति किलो असून किमान दर 22 रुपये प्रति किलो आहे.
9 मे रोजी म्हैसूरमध्ये (Mysuru) पिठाचा दर 54 रुपये प्रति किलो, मुंबईत (Mumbai) 49 रुपये प्रति किलो, चेन्नईत (Chennai) 34 रुपये प्रति किलो, कोलकातामध्ये (Kolkata) 29 रुपये प्रति किलो आणि दिल्लीत (Delhi) 27 रुपये प्रति किलो इतका दर सुरू आहे.
अशी माहिती ग्राहक मंत्रालयाने (Ministry of Consumer Affairs) दिली. (Atta Price Hike)

येत्या काळामध्ये गव्हांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
2021 – 22 मध्ये रब्बीच्या हंगामात (Rabbi Season) गव्हाच्या उत्पादनात घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सरकारकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्याचबरोबर यंदा उन्हाच्या झळा लवकरच बसू लागल्याने 111.32 दशलक्ष टन उत्पादन ऐवजी 105 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

 

दरम्यान, सरकारने खुल्या बाजारात गहू विक्रीसंदर्भात कोणतीही घोषणा केली नाही.
खुल्या बाजारात गव्हाची विक्री करून सरकार मागणी आणि किंमती नियंत्रित करते. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास जून महिन्यापासून गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महागाईचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Atta Price Hike | atta price hike inflation average retail price of wheat flour surges 13 percent in one year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा