अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणि गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या खडक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई खडक पोलिसांनी काशेवाडी येथील रिक्षा स्टँड येथे करण्यात आली. त्याच्याकडून ६० हजार रुपये किंमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. योगेश उर्फ यो मारूती गायकवाड (वय-२२ रा. महादेव मंदीराजवळ काशेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

थोरली तालीम येथून चोरीला गेलेल्या रिक्षाच्या शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपी काशेवाडी येथील अशोक रिक्षा स्टँडजवळ उभा असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल रवी लोखंडे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी दरम्यान त्याने दीड महिन्यापूर्वी पुणे स्टेशन येथून पायी जाणाऱ्या एका व्यक्तीचा १ लाख १० हजार रुपये किंमतीचा आयफोन जबरदस्तीने चोरला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून साठ हजार रुपये किंमतीची रिक्षा जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या योगेश गायकवाड याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, घरफोडी, बाल लैंगिक अत्याचार, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हि कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे, तपास पथखाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, रवी लोखंडे, विशाल जाधव, महावीर दावणे, आशिष चव्हाण, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, इम्रान नदाफ, योगेश जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

Loading...
You might also like