आर्थिक वादातून पुण्यात व्यापाऱ्याला तलवार आणि रॉडने बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. किरकोळ कारणावरून गाड्याची तोडफोड, जाळपोळ, हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवणे असे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुपेश ओमप्रकाश गुप्ता (वय-45) नावाच्या व्यवसायिकाला दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गुप्ता यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादेवरून गोकुळ बाळकृष्ण आठरे, नागेश जालिंदर मुळे, नवनाथ पांडुरंग सस्ते, अविनाश अवचारे, गणेश वाघचौरे यांच्यासह 8 ते 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुपेश गुप्ता यांचा होमलिक एंटरप्रायजेस नावाचा विद्युत उपकरणे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. आरोपी गोकुळ आठरे याच्यासोबत भागिदारीमध्ये व्यवसाय आहे. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये आर्थिक वाद आहेत. गोकुळ आठरे याच्याकडे गुप्ता यांचे 34 लाख 50 हजार रुपये येणे असल्याने त्यांनी आठरे याला माल देणे बंद केले.

दरम्यान, सोमवारी (दि.14) दुपारी पावणे चारच्या सुमारस आरोपींनी गुप्ता यांच्या ऑफिसमध्ये येऊन दुकानातील कामगार तुषार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या गुप्ता यांना रॉड आणि तलवारीने माराहण केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. जखमी गुप्ता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आरोपींनी 7 ते 8 लाख रुपयांचे नुकासान केले असून दुकानात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी