बुर्किना फासोमध्ये हल्लेखोरांचा मशिदीवर हल्ला, 16 लोकांचा मृत्यू

ओगाडुआगो : वृत्तसंस्था – पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशातील मशिदीवर शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ दरम्यान साल्मोसीमध्ये असणाऱ्या सर्वात मोठ्या मशिदीवर हल्ला केला. मशिदीत प्रवेश करताच बंदूकधार्‍यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जवळच असलेल्या गोरोम शहरातील रहिवाशांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. तसेच या हल्ल्यानंतर साल्मोसी रहिवासीही घरं सोडून पळून गेले.

या हल्लेखोरांबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकली नाही. बुर्किना फासोमध्ये आतापर्यंत आत्मघाती स्फोटांमध्ये बंडखोरांनी सुमारे 600 लोकांचा बळी घेतला आहे. तसेच सुमारे 3,00,000 लोकांनी घरे सोडून पलायन केले आहे तसेच सुमारे 3,000 शाळाही बंद आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like