Beed News : बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने सपासप वार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलावारीने वार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडित अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोपट बोबडे (वय-27 रा. महालक्ष्मी चौक, रामनगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलीचे आई-वडील 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेले होते. घरी वृद्ध आजोबा असल्याने पीडित मुलगी घरी होती. मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आली असता आरोपी पोपट बोबडे याने पाठिमागून येऊन अचानक तिच्यावर तलावरीने हल्ला केला. मात्र तिने हा वार हातावर झेलला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खासगी शिकवणी चालकाने पाठवला मुलीला अश्लील मेसेज
अंबेजोगाई : खासगी क्लासमध्ये नोकरी करत असलेल्या 21 वर्षीय युवतीला क्लास चालकाने एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी मागणी घातली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवर सतत अश्लील मेसेज करुन त्रास देत विनयभंग केल्याची घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्लास चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कल्याण मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी शिकवणी चालकाचे नाव आहे.