कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला (व्हिडिओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कन्नडचे माजी आमदार आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना शिवसेनेला मुस्लिमांचे वावडे आहे तर मग अब्दुल सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

ज्या वेळी हल्ला झाला, त्यावेळी जाधव घरी नव्हते. घरात त्यांची पत्नी संजना जाधव व दोन मुले होते. चार जणांनी मध्यरात्री येऊन त्यांच्या घरावर दगडफेक केली. बाहेर उभ्या असलेल्या गाडीवर दगड मारुन तिच्या काचा फोडण्यात आल्या. हा सर्व प्रकार सुमारे १० मिनिटे सुरु होता. हल्लेखोर जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत असल्याचे संजना जाधव यांनी पोलिसांना सांगितले.

हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढवत आहेत. विधानसभेच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपाकडे असलेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने सत्तारांसाठी मागून घेतला होता. त्याच्या उमेदवारीवरुन हर्षवर्धन जाधव यांनी टिका केली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी