हॉटेल राजवाडाचे मालक यांच्यावर प्राणघातक हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – रावेत येथील हॉटेल राजवाडाचे मालक यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्याराने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेलच्या पार्कींगमध्ये घडली. या हल्ल्यात मालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विजय ढुमे असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. हॉटेल चालक दिनाकर शेट्टी याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रावेत येथे राजवाडा हॉटेल आहे. रविवारी ड्राय डे होता. विजय ढुमे हे हॉटेल मधून घरी निघाले होते. पार्किंग मध्ये स्वतःच्या मोटारीत बसले असताना दुचाकीवरून काहीजण तेथे आले.

त्यांनी ढूमे यांच्याकडे दारुची मागणी केली. मात्र ड्राय डे असल्याने ढूमे यांनी नकार दिला. त्यावेळी ढुमे यांना मोटारीतून खाली खेचुन लाकडी दांडके आणि कोयत्याने वार करण्यात आले. ढूमे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास पोलीस करत आहेत.