आषाढी यात्रेत पोलिसावर हल्‍ला, कर्मचारी जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – खाकीबा डोंगरावरील आषाढ जत्रेत मद्यपींनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. आज दुपारी तीन वाजता श्रीगोंदा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली.

संजय कोतकर हे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आषाढ महिन्याच्या निमित्ताने खाकीबा डोंगरावर खाकीबाचा मोठा यात्राउत्सव भरतो. त्याठिकाणी बोकडांचा बळी आणि दारूचाही पूर असतो. यात्रेकरूंची गर्दी मोठी असल्याने बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस संजय कोतकर वाहतूक नियंत्रणात आणत होते. याचवेळी पाच- सहा मद्यपींनी संजय कोतकर यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत कोतकर हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती समजताच श्रीगोंदा पोलिसांनी खाकीबा यात्रेकडे रवाना झाले आहेत. यात्रेमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Loading...
You might also like