Attack On Police Officer | जुगार अड्डयावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जुगार्‍यांचा हल्ला, 5 पोलिस जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – Attack On Police Officer | जुगार अड्डयावर कारवाईसाठी (Action On Gambling Den) गेलेल्या पोलिस पथकावर (Maharashtra Police) जुगार्‍यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्हयातील (Dhule District) वरखेडी गावाजवळ रविवारी रात्री घडली आहे. यामध्ये 5 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (Dhule LCB) 5 पोलिस यामध्ये जखमी झाले असून याप्रकरणी धुळे तालुका पोलिस (Dhule Taluka Police Station) ठाण्यात 23 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Attack On Police Officer)

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील वरखेडी गावाजवळ असलेल्या एका मंदिराच्या पाठीमागील बाजुस एका घरात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची गोपीनय माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस कर्मचारी तेथे कारवाईसाठी गेले. त्यावेळी तेथे जुगार खेळणार्‍या खेळींनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. त्यामध्ये 5 पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी (Police Officer Injured) झाले. यासंदर्भात पोलिस कर्मचारी योगेश ठाकूर (Police Yogesh Thakur) यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तब्बल 23 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 19 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी अटक आरोपींना धुळे न्यायालयात (Dhule Court) हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना
2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास धुळे तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.

Web Title : Attack On Police Officer | Gamblers attacked the policemen who went to take action at the gambling den, 5 policemen were injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार