धक्कादायक ! कुटुंबियांकडूनच ‘त्या’ महिला पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खरांगण गावात महिला पोलीस पाटलावर जमीनीच्या वादातून ४ पुरुषांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात महिलेला जबर मार लागला आहे.

अंजना भाऊ घोडविंदे असे महिला पोलीस पाटलाचे नाव आहे. महिलेवर हल्ला करणारे तिच्या कुटुंबातीलच आहेत. दत्तात्रय मालू लकडे, ज्ञानेश्वर दत्तात्रय लकडे, आणि महेश दत्तात्तरय लकडे अशी त्यांची नावे आहेत.

अंजना घोडविंदे या महिलेच्या ओठाला, हाताला, आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यामळे महिला गंभीर जखमी झाल्याने तिला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading...
You might also like