
नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीता म्हात्रे यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार
नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – नवी मुंबईच्या (Navi Mumbai) भाजपाच्या नगरसेविका संगिता म्हात्रे (BJP corporator Sangita Mhatre) यांच्या पतीवर दोघा हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यातून संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) हे थोडक्यात बचावले असून त्यांच्या खांद्यांवर खोलवर जखम झाली आहे. वाशी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
ही घटना कोपरखैरणे येथील सेक्टर ६ मधील संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) यांच्या कार्यालयात रविवारी रात्री घडली. संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) हे कार्यालयात असताना दोघे हल्लेखोर आले. त्यांच्याकडे कोयते, चाकू व रिव्हाल्व्हरही होते. दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. आपल्यावर हल्ला होत असल्याचे संदीप (Sandeep Mhatre) यांच्या लगेच लक्षात आल्यावर त्यांनी बाजूला होण्याचा प्रयत्न केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
त्यात हल्लेखोरांचा वार खांद्यावर बसले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर कार्यालयाबाहेर असलेल्या लोक जमू लागले. हे पाहून हल्लेखोर पळून जाऊ लागले. लोकांनी त्यांच्यातील एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. त्याच्याकडे कोयता, चाकू व रिव्हॉल्व्हर मिळाले आहे. रिव्हॉल्व्हर असतानाही हल्लेखोरांनी त्याचा वापर केला नाही. हल्ल्यामागील कारण अजून स्पष्ट झाले नाही. नवी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु
Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती
Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांमध्ये वाढ, 414 रुग्णांना डिस्चार्ज