थेऊरफाटा येथील ताम्हाणेवस्तीवर मध्यरात्री हल्ला, दांपत्य गंभीर जखमी

 पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ता. हवेली येथील ताम्हाणेवस्तीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका कुटूंबातील दांपत्यावर जीवघेणा हल्ला केला असून दोघेही गंभीर जखमी असून त्यांना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक रामदास चौरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आज शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनी त्याचे मामा गणेश ताम्हाणे यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा गणेश ताम्हणे तेथे आल्या त्यावर हल्लेखोरांनी त्यांच्याही डोक्यात वार केला.या हल्ल्यात दोघेही दांपत्य गंभीर जखमी झाले असून शुध्दीवर नाहीत.या हल्ल्याचा उद्देश अस्पष्ट आहे.

हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे पुढील तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी