बारामतीमध्ये जमावाचा पोलिसांचा हल्ला, अधिकार्‍यांसह 6 पोलिस जखमी, महिला कर्मचार्‍याचाही समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसाच्या लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तरी देखील काही जण काही काम नसताना घराबाहेर फिरताना दिसत आहेत. डॉक्टरांनी ज्यांना होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश दिले आहेत असे काही महाभाग देखील घराबाहेर दिसतात. पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, होम क्वारंटाइन असलेल्यांना बाहेर पडू देऊ नका असं सांगणार्‍या युवकालाच काही जणांनी बारामतीमध्ये मारहाण केली. त्यानंतर तिथं पोहचलेल्या पोलिस पथकावर देखील हल्ला झाल्याची खळबळजनक घटना बारामती शहरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, इतर 2 अधिकार्‍यांसह 6 पोलिसांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये काही जणांना जबर मारहाण झाली आहे. अनेकांनी पोलिसांच्या डोक्यात व हातावर काठीने हल्ला केला आहे तर काही जणांना दगडाने मारहाण झाली आहे. दरम्यान जखमी झालेल्या पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार आणि पद्मराज गंपले, कर्मचारी सिध्देश पाटील, पोपट नाळे, पोपट कोकाटे आणि महिला कर्मचारी स्वाती काजळे आणि रचना काळे अशा एकुण नऊ जणांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असल्याची माहिती हाती आली आहे.