इराणवरील हल्ला जगाला महागात पडणार, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका – इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे अमेरिकेने इराणच्या लष्कर प्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करून ठार केले. अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

यामुळे इराण संतप्त झाला असून जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी धमकी इराणकडून देण्यात आली आहे. यानंतर अमेरिकेच्या दूतावासावर इराणच्या एका संघटनेने हल्ला केला. यामुळे पश्चिम आशियातील वातावरण तापलेले असून इंधन दरवाढ व्हायला सुरुवात झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत 67.12 डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कसा मारला गेला सुलेमानी ?
इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्‍युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्‍युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याचे समजते.

सुलेमानी इराकमधील अमेरिकी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला करण्याचे कट रचत होता म्हणून आत्मसंरक्षणासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्यात इराकच्या एका संघटनेचा म्होरक्या अबू महदी अल मुहादिन याच्यालसह अन्य पाच जण ठार झाले आहेत मात्र आता याचा परिणाम संपूर्ण जगावर पहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

इराणकडून या हल्ल्याचा तीव्र निषेद व्यक्त करण्यात आलेला आहे.परराष्ट्र मंत्री जावद झरीफ यांनी सांगितले की, अमेरिका जागतिक दहशतवादी असल्यासारखे वागत आहे. अमेरिकेला याची जबाबदारी घ्यावीच लागेल. सुलेमानीवरील हल्ला हा अमेरिकेने केलेली घोडचूक आणि धोक्याचे आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/