धुळे : पोलीस पाटीलसह ग्रामस्थांनकडून पोलीसांना धक्काबुक्की

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पेटले गावात पिण्याचे पाण्याचे टाकी जवळ वाद मिटविण्यास गेलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पोलीस पाटील व गावातील आठ ते दहा जणांनी हल्ला चढविला.
सविस्तर माहिती की, रविवारी राञी 10 वाजेच्या सुमारास पेटले ता. साक्री जिल्हा धुळे येथे पाण्याच्या टाकी जवळ रस्त्यावर सार्वजनिक जागी रामभाई राजु पवार रा.जामदा यास पेटले गावातील लोक मारहाण करत होते. हे पाहुन पो.ना.वामन मंगल्या चौधरी हे वाद मिटविण्यासाठी तिथे गेले. मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून त्या व्यक्तीला सोडविण्याचा प्रयत्न करताना पेटले गावाचे पोलीस पाटील सह आठ ते दहा लोकांनी वामन चौधरी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. सगळे जण फरार आहे. या प्रकरणी सरकारी नोकर हल्ला म्हणुन निजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धुळे शहरात मोगलाई भागात ही गोविंदा पथक दहिहंडी फोडण्यासाठी परिसरात गर्दी झाली होती. डिजेच्या आवाजावर नाचगाणी सुरु होते. वेळ मर्यादा होऊन गेली. नाचगाणी बंद करा सांगत असताना पोलीस अधिकारी मोरे यांनाहि गोंविदानी धक्काबुक्की केली.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या