मुंबईत पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 4 जण गंभीर जखमी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – संचारबंदी सुरु असल्यामुळे अँटॉप हिल परिसरात गर्दी करू नका, आपापल्या घरी जा ! असे सांगत रुट मार्ग काढणार्‍या पोलिसांवरच 10 ते 15 जणांच्या टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात चार पोलिस कर्मचार्‍यांसह उपपोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एसआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे. जखमीवर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिस कोकणी आगारात आले असता त्यांनी चौकांत उभ्या असलेल्या तरुणांच्या घोळक्याला हटकले. मात्र, तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत दगडफेक केली. काही माथेफिरु तरुणांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचार्‍यांसह उपपोलिस निरीक्षक चंद्रकांत बुद्धे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांमध्ये 5 ते 6 महिलांचा समावेश आहे. सर्व 17 आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, कोरोनाविरुद्ध कर्तव्य बजावणार्‍या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिस यांनाही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पोलिस दलात कोरोनामुळे सहावा बळी गुरुवारी गेला आहे. असे असतानाही पोलिसांवरील हल्ले सुरुच असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.