‘WhatsApp’च्या मदतीने होऊ शकते तुमच्या मोबाईलमधील फाईल्सची चोरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु बऱ्याच वेळेला व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना हॅकिंगला तोंड द्यावे लागते. हे थेट होत नाही तर व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेऊन युजरला लक्ष्य केले जाते. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि फायरफॉक्स असेल तर तुम्हाला अनोळखी फाईल ओपन करणे महागात पडू शकते.

ही समस्या थेट व्हॉट्सअ‍ॅपची नसून फायरफॉक्स ब्राऊजरची कमतरता आहे. या कमतरतेचा फायदा घेऊन हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप युजरच्या महत्वाच्या डॉक्युमेंट्स चोरी करू शकतात. हा पूर्ण खळे अटॅचमेंटचा आहे. त्यामुळे कोणतीही अनोळखी फाईल मोबाईलमध्ये ओपन केली नाही पाहिजे. कारण हॅकर्ससाठी सर्वात सोपा मार्ग अटॅचमेंटच्या माध्यमातून टार्गेट डिव्हाइसमध्ये स्क्रिप्ट पाठवणे हा आहे. यालाच बरेच युजर्स बळी पडतात.

ही समस्या अँड्रॉइड युजरसोबतच आहे. इटलीतील एक ट्विटर युजरने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याने डेमो दाखवला आहे. या डेमोमध्ये व्हॉट्सऍपच्या अटॅचमेंटला फायरफॉक्स ब्राऊजरमधून ओपन केल्यास हॅकर्सचे काम कसे सोप्पे होऊ शकते हे दाखवले आहे.

आरोग्यविषयक बातम्या

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात
दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा
लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा
अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

Loading...
You might also like